मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच आहे असं ठणकावलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र, मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील असं सांगितलं. एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करु असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
“लोक वर्ष दीड वर्षाने मुंबईत येतात तेव्हा बदललेली मुंबई पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठे यांनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करत आहेत,” असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांची कविता वाचून दाखवली.