उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. मात्र, काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत हा चित्रपट अडकला आहे. आता, लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडे सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्याबाबत 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, प्रमाणपत्र मिळाल्यास 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ शकतो.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासंदर्भाने दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे, लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.