सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात नांगोळे येथे एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्रशान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर संपूर्ण कुटुंबाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
या घटनेमध्ये दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) व काजल समीर पाटील (वय ३०) असं या सासू-सुनांचे नावे आहेत,तर अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील या दोघा बाप लेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.