पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने उचललं टोकाचं पाऊल! झाडाला घेतला गळफास

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन टोकाचं पाऊल उचलल्याची घटना सामोर येत आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईन्टलगत त्यांनी झाडाला गळफास घेतला. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा गुंजाळ असं या पोलिस उपनिरिक्षाकांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अण्णा गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते तीन दिवसांपासून कर्तव्यायवर नव्हते. तसेच त्यांच्यासोबत संपर्कही होत नव्हता. मात्र, आज त्यांचा शोध लागला तेव्हा त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे, या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं. पण अद्याप पोलिसांनी याबाबत काही माहिती दिली नाही. त्यांची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here