
शहरात सध्या एका प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरत आहे. यात ताप, सर्दी, अंगदुखी आणि खोकला अशी लक्षणं घेऊन हजारो रुग्ण शहरातील क्लिनिक आणि रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या इन्फेक्शनमुळे येणारा ताप सहसा 3-4 दिवसांत उतरतो, मात्र त्यानंतर सुरू होणारा खोकल्याचा त्रास 2 ते 3 आठवडे टिकतो. यामुळे रुग्णांना सततचा त्रास होतो असून अनेकजण वैतागले आहेत. या व्हायरल इन्फेक्शनमुळे फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याने खोकला दीर्घकाळ जात नाही असे डॉक्टरांचे मत आहे.
व्हायरल इन्फेक्शनची लक्षणं
ताप 3-4 दिवस टिकणारा
सततचा कोरडा किंवा खवखवणारा खोकला
घशात कोरडेपणा, खवखव
अंगदुखी, डोकेदुखी
थकवा आणि अशक्तपणा
नाक वाहणे किंवा बंद होणे
प्रत्येक वर्षी या कालावधीत अशा प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन्स दिसून येतात. मात्र यंदा खोकल्याचा त्रास अधिक काळ टिकतो आहे. म्हणून आरोग्य विभागाने खालील बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
वारंवार हात धुवा, स्वच्छता पाळा
खोकणाऱ्या आणि ताप असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा
शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका, भरपूर पाणी आणि गरम पेये प्या.
घशासाठी गरम पाणी, हळद-मीठाचा गुळण्या, सूप इत्यादींचा वापर करा