आम्हाला हिंदीमध्ये नोकराचीच भूमिका मिळायची, अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत

अशोक सराफ यांनी ‘अमुक तमुक’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत फक्त दुय्यम भूमिका मिळायच्या. अशोक सराफ यांनी ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘गुप्त’, ‘जोरु का गुलाम’, ‘सिंघम’, ‘करण अर्जुन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अशोक सराफ यांना कधीच हिंदी चित्रपटसृष्टीत हिरोची भूमिका मिळाली नसल्याचं अशोक सराफ यांनी म्हटलं.

पुढे अशोक सराफ म्हणाले, मराठी लोकांची इमेज ही बॉलिवूडमध्ये बसत नाही. कारण त्यांच्या मते चित्रपटांमधील हिरो गोरा पान असावा. त्यामुळे तो गोरा असेल तर तो काय काम करतो हे कोणाला माहित नसतं. पण आपण गोरे नसल्यामुळे आम्हाला कधीच हिरोचा रोल मिळाला नाही. मला आणि लक्ष्मीकांतला हिंदीमध्ये नोकराची भूमिका मिळायची. त्यामुळे तेव्हा ते करायचं की नाही ते आम्हाला ठरवाव लागत होतं. पैसे चांगले देत असतील तर ते करण्यासाठी काहीच हरकत नव्हती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here