आरजे महवश ट्रोलर्सवर भडकली, दिलं सडेतोड उत्तर

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्यांच्या पत्नी धनश्री वर्मा यांचं नातं आता संपल्यानंतर युजीचं नाव चर्चेत आलं ते RJ महवशसोबत. अलीकडे चहल आणि महवश अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. मग तो IPL चा सीझन असो की लंडनमधील बर्थडे वेकेशन. याचमुळे महवश सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करतेय. अनेकांनी तिच्यावर “नवरा चोरला”, असं म्हणत सडकून टीका केली आहे. पण आता स्वतः महवश पुढे आली आहे आणि तिने एक व्हिडीओद्वारे नेटिझन्सला फटकारत सडेतोड उत्तर दिलं आहे.

महवशने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलं “कुणाचा नवरा चोरणं? हो, ते चीटिंगच आहे”. यावर तिला ट्रोल करताच तिने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, “माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीच बहुतेक मला चोरताना पाहिलंय! लोक काहीही बातम्या बनवतात, फक्त व्यूज मिळावेत म्हणून.” त्यासोबतच, तिने एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ती स्पष्ट करते की कोणत्या कोणत्या गोष्टींना ‘चीटिंग’ म्हणता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here