ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी त्यांचे पुण्यातील अतिशय प्राईम लोकेशनवरील लक्झरी फ्लॅट विकल्याची माहिती आहे. त्यांना 3401 स्केअर फूट घराची किंमत 6 कोटी 15 लाख रुपये इतकी मिळाली आहे.
आशा भोसले यांनी हे घर फेब्रुवारी 2013 मध्ये 4 कोटी 33 लाखाला खरेदी केलेले. त्याच्या तुलनेत आता या घराच्या किमतीला 42 टक्क्यांनी वाढ मिळाली आहे.