आशियाई क्रिकेट काउन्सिलने 2 ऑगस्ट रोजी परिपत्रक जाहीर करून आशिया कप 2025 स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली आहे. यानुसार आशिया कप 2025 ही स्पर्धा दुबई आणि अबुदाबी या दोन ठिकाणांवर खेळवली जाणार आहे. आगामी 2026 चा वर्ल्ड कप हा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. तेव्हा यंदाची आशिया कप स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असून 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आशिया कप 2025 चे सामने खेळवले जातील. यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुद्धा खेळवला जाणार आहे.
सूर्यकुमार यादव हा स्पोर्ट्स हर्नियाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता त्यावर सर्जरी करायला लागली त्यामधून सध्या तो बरा होतोय. त्यामुळे सूर्यकुमार यादव ऐवजी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवलं जाऊ शकतं.
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंह, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, हर्षित राणा/यश दयाल/प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.