उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्या दरम्यान महसूल भवनाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी त्यांनी कंत्राटदाराला कडक शब्दांत खडसावलं. चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला काळ्या यादीत टाकेन असा इशाराही अजित पवारांनी दिला. दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र सकाळपासूनच दिसून आलं.
अजित पवारांनी महसूल भवनाची पाहणी करताना कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा प्रकार चालणार नाही असं सांगितलं. “कोणाला काहीही द्यायचं काम नाही. राज्याला आम्ही 1100 ते 1200 कोटींचा निधी दिला आहे. तुम्ही जर चांगलं काम केलं नाही, तर ब्लॅक लिस्टमध्ये टाकेन. तुम्ही माझ्या हाताखाली काम करता. इथे चुकीचे प्रकार चालणार नाहीत,” अशी तंबीच अजित पवारांनी दिली.