रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. 2025 च्या अखेरीस पुतिन भारतात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने दंड म्हणून भारतावर एकूण 50 टक्के आयातशुल्क आकारलं आहे. यादरम्यान पुतिन यांचा भारत दौरा याकडे धाडसी पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.
“रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्यासाठी आम्ही फार उत्साही आहोत. आम्हाला वाटतं तारखा जवळपास निश्चित झाल्या आहेत,” असं अजित डोवाल यांनी सांगितलं आहे.