भारतासाठी चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळल्यानंतर क्रिकेटपासून दूर गेलेला विराट कोहली नुकताच लंडनमध्ये नवीन लूकमध्ये दिसला. भारतीय वंशाचे उद्योजक शश यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, कोहलीने फिकट राखाडी रंगाच्या टी-शर्टवर गडद राखाडी रंगाची हुडी घातली आहे. तसेच गडद निळ्या रंगाचे जॉगर्स घातले आहेत. पण त्याच्या दाढी आणि मिशीच्या रंगाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फोटोमध्ये विराटची दाढी आणि मिशी पूर्ण पांढरी दिसत आहे.
विराट कोहलीने नुकतंच एका कार्यक्रमात आपण केसांना रंग लावत असल्याचा खुलासा केला आहे. “दोन दिवसांपूर्वी मी माझे केस रंगवले होते. जेव्हा तुम्ही दर चार दिवसांनी असं करणं सुरु करता तेव्हा वेळ झाली असं समजावं,” असं कोहलीने लंडनमध्ये युवराज सिंगकडून आयोजित कार्यक्रमात सांगितलं होतं.