आरोग्यवार्ता! मुंबईत जीबीएसचा पहिला मृत्यू! मुंबईकरांनो सावधान!

राज्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा कहर सतत वाढत आहे. जीबीएस हा नसांशी संबंधित एक गंभीर आजार आहे. जीबीएस विषाणूमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यानंतर आता मुंबईत पण जीबीएसचा धोका वाढतोय. या विषाणूने आता मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर दाखल असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईत जीबीएस संसर्गामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. अशाप्रकारे आतापर्यंत राज्यात मृतांची संख्या 8 वर गेली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएसमुळे मृत्युमुखी पडलेला हा 53 वर्षीय रुग्ण, वडाळा (मुंबई) येथील रहिवासी होता, तो बीएमसीच्या बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. आजारी पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर एका 64 वर्षीय महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील अंधेरी पूर्व भागातील रहिवासी असलेल्या या महिलेला ताप आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर तिला अर्धांगवायू झाला.

व्हेंटिलेटरची गरज कधी पडते?
जीबीएस हा रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाडामुळे उद्भवतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य संसर्गानंतरही जीबीएसची स्थिती उद्भवू शकते. जेव्हा हा संसर्ग छातीत पसरतो तेव्हा व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. या स्थितीला ‘छातीचा पक्षाघात’ म्हणतात. काही औषधे आणि थेरपीद्वारे जीबीएस पासून बरे होणे शक्य आहे. पण यावर कोणतीही लस उपलब्ध नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here