शिरवळ परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ! भंगार गोडाऊनला आग!

शिरवळ परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. या आगीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असून, परिसरातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक, थर्माकोल व इतर केमिकलयुक्त पदार्थ जळल्यामुळे हवा विषारी होत आहे, ज्याचा थेट फटका लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना बसत आहे.
दरमहिन्याला कोणत्या ना कोणत्या भंगार गोडाऊनला आग लागते. काहीवेळा ही आग लहान प्रमाणात असते, तर काहीवेळा ती आटोक्यात येण्याआधीच मोठ्या प्रमाणावर पसरते. त्यामुळे शिरवळमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नियमित आगींमुळे MPCB आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनांमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या आगी नैसर्गिकरित्या लागत आहेत की, हेतूपुरस्सर कोणी त्यामागे आहे, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भंगार व्यवसायिकांकडे आग प्रतिबंधक उपाययोजना आहेत का? आणि त्या कार्यान्वित केल्या जात आहेत का? याची चौकशी होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here