डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ‘हे’ सुुपरफुड्स खा

डोळ्यांमुळे आपले सौंदर्य वाढते. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे महत्त्वाचे आहे. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे. योग्य आहार केल्यास नक्कीच दृष्टी सुधारण्यासाठी मदत मिळते. चला तर मग जाणून घेऊयात, डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणते सुपरफूड्स खायला हवेत.

अंडी –

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, झिंक, ल्युटीन घटक आढळतात. हे घटक आरोग्यासाठी आवश्यक असतात.

आवळा –

दृष्टी सुधारण्यासाठी आवळा खायला हवा. आवळा खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत मिळते.

हिरव्या भाज्या –

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न असते. आयर्न डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. याच्या नियमित सेवनाने दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते.

गाजराचा रस –

गाजरातील पोषकतत्वे डोळ्यांचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे एक ग्लास गाजराचा ज्यूस नक्की प्यावा.

वेलची –

वेलचीच्या सेवनाने थंडावा मिळतो. तुम्ही दुधात वेलची आणि बडीशेप मिसळून प्यावी. डोळ्यांसाठी तुम्ही याचे सेवन करू शकता.

संत्रा –

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आढळते. यामुळे डोळ्यांच्या ऊतींना निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि दृष्टी सुधारते.

याशिवाय भोपळा, रताळे, आंबा, जर्दाळू यांसारखे पदार्थांचा आहारात समावेश करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here