विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदान केले, असे विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे ते एका कार्यक्रमात बोलत होते.
आमदार सुरेश धस म्हणाले, “भाजपचे आज १३४ जागा आहेत. २२५ आमदारांचे बहुमत आहे. कारण काय, तर हा तमाम महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघतो.”
“देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आहे. ते ईमानदार आहेत, याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे. या प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्याबरोबर घड्याळही निवडून दिले. आमच्याबरोबर बाणही हाणला. अजिबात मागे पुढे बघितलं नाही. घड्याळाला आमच्या लोकांनी मतदान केलं. एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाणालाही केलं”, असे सुरेश धस म्हणाले.