सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी हे दोघेही आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. कियारा व सिद्धार्थ यांच्या लग्नाला ७ फेब्रुवारीला दोन वर्षे झाली. आता त्यांच्या आयुष्यात नवीन सदस्य येणार आहे. कियारा व सिद्धार्थ यांनी एक फोटो शेअर करून ही गुड न्यूज शेअर केली आहे. दोघांनी हातात बाळाच्या मोचे पकडलेला एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोबरोबर एक क्युट कॅप्शन देत त्यांनी ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
“आमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट… लवकरच येत आहे,” असं कॅप्शन कियाराने या फोटोला दिलं आहे. कियाराने हा फोटो पोस्ट केल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट केल्यानंतर काही दिवसांनी आता त्यांनी आई-बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली आहे. सिद्धार्थ व कियारा दोघांचेही चाहते व सिनेविश्वातील सेलिब्रिटी अभिनंदन करत आहेत.