वजन कमी करण्याऱ्यांसाठी सॅलड हे आवडते जेवण आहे. कमी कॅलरीज आणि ताज्या पालेभाज्या व फळांनी समृद्ध असा हा हलका जेवणाचा पर्याय अत्यंत पौष्टिक आहे. परंतु, जर सॅलड सेवनानंतर तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटत असेल, तर तुम्ही काहीतरी चूक करत असण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा परिस्थितीत तुम्ही कुठे चुकत आहात आणि तुमची चूक कशी दुरुस्त करता येईल हे समजून घेऊया…
सॅलड खाल्यानंतर तुमचे पोट का फुगते का?
सॅलडमध्ये लेट्यूस वापरले जाते. “USDA नुसार, रोमेन लेट्यूसमध्ये प्रति १०० ग्रॅम १.३ ग्रॅम फायबर असते. हे कमी कॅलरीज असलेली हिरवी पालेभाजी आहे, जी शरीरातील पाण्याची पातळीदेखील राखते. लेट्यूस सॅलड खाल्ल्यानंतर तुम्हाला पोटफुगी जाणवू शकते. कारण- लेट्यूसमध्ये जास्त फायबर असते. फायबर हे जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळू शकते.
१. कच्चे अन्न पचायला जड (Raw foods are hard to digest) : जेव्हा तुम्ही कच्चे सॅलड खाता तेव्हा तुमच्या शरीराला ते पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो.
२. घास व्यवस्थित न चावणे (Not chewing properly) : तुम्ही तुमचे सॅलड घाईघाईने खाता का? तोंडात असलेल्या salivary amylase नावाच्या एन्झाइममुळे कार्बोहायड्रेट्सचे पचन सुरू होते. जर तुम्ही अन्न योग्यरीत्या चावत नसाल, तर त्यामुळे पोटफुगी संभवू शकते.
३. पचनाच्या समस्या (Other digestive issues) : जर तुम्हाला इतर कोणत्याही पचन समस्या असतील, तर कच्चे सॅलड खाल्ल्याने तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकते. जरी लेट्यूस हा कमी गॅस निर्माण करणारा पदार्थ आहे. तरी त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतात.
सॅलडमध्ये फायबरचे प्रमाण कसे वाढवायचे?
१. तृणधान्य वापरा (Use whole grains) : क्विनोआ, ब्राऊन राईस किंवा राजगिरा यांसारखी तृणधान्ये सॅलडसाठी चांगली असतात.
२. पालेभाज्या खा (Add leafy greens) : पालक, केल (kale), लेट्यूस किंवा अरुगुला (arugula) यांसारख्या विविध प्रकारच्या पालेभाज्या खा. जर तुम्हाला ते कच्चे खायचे नसेल, तर तुम्ही त्या परतून घेऊ शकता.
३. काही क्रूसिफेरस भाज्या मिसळा (Mix some cruciferous vegetable) : तुमच्या सॅलडमध्ये कोबी, ब्रोकोली व ब्रुसेल्स स्प्राउट्स घाला; जेणेकरून फायबर आणि सल्फरयुक्त संयुगे मिळतील, जी निरोगी डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देतात.
४. सुका मेवा किंवा बिया (Sprinkle nuts or seeds) : अक्रोड, जवस, सूर्यफूल व भोपळ्याच्या बिया फायबरने समृद्ध असतात. त्यामुळे सॅलडमधील निरोगी फॅट्स आणि कुरकुरीतपणा वाढतो.