‘ससुराल सिमर का’ फेम जोडप्याचा सात वर्षांनी घटस्फोट!

सात वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न करणारे व सातत्याने चर्चेत राहणारे दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातयं. दीपिका व शोएब यांनीच आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

दीपिका व शोएब बरेचदा त्यांच्या आंतरधर्मीय लग्नामुळे ट्रोल होत असतात आणि ते दोघेही वेळोवेळी ट्रोलर्सना उत्तर देत असतात. आताही घटस्फोटाच्या चर्चांवर ते दोघे बोलले आहेत. शोएब म्हणाला “मी अशा बातम्यांवर प्रतिक्रिया देणार नाही, पण लोक याबद्दल बऱ्याच पोस्ट करत आहेत, ब्रेकिंग न्यूज म्हणत आहेत, त्यामुळे मी म्हणेन की दीपिकाने माझी फसवणूक केली आहे,” तो दीपिकाला चिडवतो आणि म्हणतो, “तू मला सांगितलं नाहीस की तू घटस्फोट घेणार आहेस?” त्यानंतर शोएबने ही गोष्ट सगळ्या कुटुंबाला सांगितली. नंतर शोएब दीपिकाला म्हणाला, “तू मला सांगितलं नाही की इंडस्ट्रीमध्ये अजून एक लग्न मोडतंय आणि ते आपणच आहोत.” यावर दीपिका म्हणाली, “मी हे सगळं लपून करते, तुला का सांगू.” यानंतर ते घरच्यांना या सर्व प्रकाराबद्दल सांगतात आणि एकच हशा पिकतो

दोघांनी या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. काहीही बातम्या छापू नका, असं शोएबने घटस्फोटाच्या चर्चा फेटाळत म्हटलं.

‘ससुराल सिमर का’ मालिकेत काम करताना पडलेले प्रेमात

शोएब व दीपिकाची प्रेमकहाणी ‘ससुराल सिमर का’च्या सेटवर सुरू झाली होती. तेथेच ते पहिल्यांदा भेटले आणि प्रेमात पडले. त्यांनी २०१८ साली भोपाळमध्ये लग्न केले. त्यानंतर हे दोघे २०२३ मध्ये एका मुलाचे आई-वडील झाले. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, त्यांच्या व्लॉगमधून ते चाहत्यांशी कनेक्टेड राहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here