हा इतिहास शाळेत का नाही शिकवला गेला? ‘छावा’ पाहुन माजी क्रिकेटपटूचा सवाल

अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. सामान्य चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही चित्रपटाचे कौतुक करत त्यावर पोस्ट टाकत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनीही नुकताच ‘छावा’ चित्रपट पाहिला. मात्र, त्यानंतर त्यांनी जे काही लिहिले त्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

आकाश चोप्रा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, “मी छावा चित्रपट पाहिला. शौर्य आणि अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य दाखविताना ज्या निस्वार्थी वृत्तीचे दर्शन झाले, त्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का नाही शिकवला गेला?”

आकाश चोप्रा यांनी पुढे लिहिले, “छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तर नाहीच नाही पण त्यांचा साधा उल्लेखही कुठे नाही. आपल्याला अकबर कसा मोठा आणि न्यायप्रिय राजा होता, हे शिकवले गेले. तर राजधानी दिल्लीत एका रस्त्याचे नाव औरंगजेब आहे. हे सर्व का आणि कसे घडले?”

यानंतर त्यांच्या पोस्टखाली अनेक कमेंट्स आल्या आहेत. काहींनी या विधानावरुन आकाश चोप्रा यांच्यावर टीकाही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here