अभिषेक बच्चनने पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत आराध्याबद्दल सांगितले. ‘मी आराध्याच्या संगोपनाचे सर्व श्रेय तिच्या आईला देऊ इच्छितो. मला बाहेर जाऊन चित्रपट बनवण्याची स्वातंत्र्य आहे पण ऐश्वर्याने आराध्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. ती खूप छान आहे. मला हे खूप आश्चर्यकारक वाटते’, असे अभिषेकने मुलाखतीत म्हटले.
तरुण मुले इंस्टाग्राम, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर व्यस्त असताना आराध्या या सर्व गोष्टींपासून दूर राहते. माझी मुलगी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आणि तिच्याकडे फोनही नाही, असे अभिषेकने सांगितले. ‘ती कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आणि तिच्याकडे फोनही नाही. मला वाटतं की ती एक कर्तव्यदक्ष मुलगी म्हणून वाढली आहे. ती वैयक्तिकरित्या जे आहे ते मी तिच्यापासून हिरावून घेऊ इच्छित नाही. ती एक अतिशय सुंदर छोटी मुलगी बनत आहे. ती आमच्या कुटुंबाचा अभिमान आहे. आम्ही भाग्यवान आहोत.’, असे सांगत अभिषेकने लेकीचं कौतुक केलं.