समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण मात्र तितक्याच विचित्र अपघातात दोघे भाविक ठार तर १३ जखमी झाले. यातील तिघा महिलांची प्रकृती गंभीर असून इतर भाविक किरकोळ जखमी आहेत. १३ जखमीवंर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मृत आणि जखमी यवतमाळ जिल्ह्यातील आसेगाव देवी ( तालुका बाभुळगाव ) येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. ते शिर्डी येथे दर्शनाकरिता जात होते.
आज शनिवारी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्हा हद्धीतील माळ सावरगाव (तालुका सिंदखेड राजा) नजीकच्या मुंबई कॅरिडोर वर हा भीषण अपघात झाला. आज शनिवारी सकाळी आसेगाव देवी (तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ) येथून भाविक क्रूजर (क्रमांक एम एच -२५-आर -३५७९) गाडीने शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी निघाले होते तेव्हा हा अपघात झाला.
सिंदखेडराजा जवळील माळसावरगाव येथे मुंबई कॅरिडोर चायनैज क्रमांक ३४४.७ जवळ क्रुझर च्या डाव्या बाजूचे पाठीमागील टायर फुटल्याने सदर क्रुझर अनियंत्रित झाली. यामुळे हे वाहन भरवेगात उलटले. नेमके त्याच वेळी पाठीमागून क्रेटा कार (क्रमांक एम एच -२९-सीबी -९६३० ) भरवेगात येत होती. क्रूझर अचानक उलटल्याने चालक हर्षल देवानंद भाग्यवंत (वय २८ वर्ष राहणार यवतमाळ) यांना अंदाज न आल्याने क्रुझरला क्रेटा कार पाठीमागून भरवेगात धडकली.
यामुळे क्रूझर मधील विद्याबाई साबळे वय ५५ वर्ष आणि मोतीराम बोरकर वय साठ वर्ष (दोन्ही आसेगाव देवी तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच भावना रमेश राऊत वय ३०, प्रतिभा अरुण वाघोडे वय ४५ वर्ष ,मीरा गोटफोडे वय ६५ वर्ष ह्या तिघीजणी गंभीर जखमी झाल्या. याशिवाय क्रूझर चालक संतोष साखरकर वय २८, कमला जाधव वय ५५,वर्ष सुशीला जाणार वय ५२ वर्ष, मिरा राऊत वय साठ वर्ष, छायाबाई चव्हाण वय ६५ वर्ष, प्रमिला घाटोळ वय ६०, वर्ष, भक्ती राऊत वय ५ वर्ष, रमेश राऊत वय ४० वर्ष, बेबीबाई येलोत वय ६० वर्ष, मोतीराम बोरकर वय ६५ वर्ष (सर्व राहणार आसेगाव देवी तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ) हे किरकोळ जखमी झाले. क्रेटा कार मधील कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.