तारक मेहता मधील अभिनेत्याची आत्महत्या!

बॉलिवूड अभिनेता ललित मनचंदाने आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. अभिनेता रविवारी आपल्या रुममध्ये झोपण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो बाहेर आलाच नाही. कुटुंबीय सकाळी उठवण्यासाठी गेले असता त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून ते तणावात होते. अभिनेत्याने अशाप्रकारे जीवन संपवल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. सोमवारी अभिनेत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागील अनेक दिवसांपासून काम मिळत नसल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होते. ४८ वर्षीय ललित मनचंदा मागील १२ वर्षांपासून मुंबईत वास्तव्य करत होते. आर्थिक समस्यांमुळे पत्नी तरु मनचंदा आणि १८ वर्षीय मुलगा उज्ज्वल आणि मुलगी श्रेयासह सहा महिन्यांपूर्वी ते मेरठला परतले होते. प्राथमिक तपासानुसार, त्यांच्या आत्महत्येमागे आर्थिक समस्या हेच कारण दिसत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here