तुषार घाडीगांवकरच्या आत्महत्येनं मनोरंजन सृष्टीत खळबळ!

मराठमोळा अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगांवकरनं आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्याच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला आहे. तुषारनं चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं होतं. तर काही दिवसांपासून तुषार हा मानसिक तणावातून जात असल्याचं म्हटलं जात आहे. त्याला कंटाळूनच त्यानं आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. तर त्याच्या निधनानं अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. तुषारच्या निधनाची बातमी अभिनेता अंकुर वाढवेनेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली. त्यानं तुषारच्या निधनानं धक्का बसल्याचं सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.

तुषारच्या मुळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील आहे. तुषारनं नाटकातून अभियन क्षेत्रात पदार्पण केलं. तर मुंबईतील रुपारेल कॉलेजमधील नाट्य विभागात तो सक्रिय होता. कॉलेजनंतर मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या मनोरंजनाच्या क्षेत्रातून त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दरम्यान, त्यानं इतकं मोठं पाऊल उचलल्यानं कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काम मिळत नाही म्हणून इतकं मोठं पाऊल नाही उचलायचं, असं बोलताना दिसत आहेत. तर अनेकांनी इतका मोठा निर्णय का घेतलास असा सवाल करत त्यांचं दु:ख व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here