ADHD म्हणजे अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिविटी डिसऑर्डर. या आजाराची लक्षणं लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात असल्याचं दिसून येत होते. पण आता ADHD ची लक्षणे मोठ्या व्यक्तींमध्ये देखील दिसत आहेत. ADHD हा एक मेंटल डिसऑर्डर आहे. यामध्ये मेंदूची वाढ ही सामान्याच्या तुलनेत खूप हळूहळू होताना दिसते. यामध्ये ती व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवर लक्षकेंद्रित करु शकत नाही. तसेच मल्टीटास्किंग सारख्या गोष्टींचा देखील या सगळ्यावर परिणाम होताना दिसत आहे.
ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटर आणि कॉलेज ऑफ मेडिसिनच्या नवीन अभ्यासात याचा खुलासा झाला आहे की, जवळपास 25% मोठ्या व्यक्तींना एडीएचडीचा त्रास होताना दिसत आहे. म्हणजे चारपैकी एक तरुण यामध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. 18 ते 44 या वयोगटात 4.4% लोकांना एडीएचडीचा त्रास होताना दिसत आहे. काय आहे या आजाराची कारणे आणि तरुण का होत आहेत याचे शिकार.
अनुवांशिक कारणे
मेंदूची रचना
गर्भधारणेदरम्यान धूम्रपान, मद्यपान, चिंता, ताण
प्रसूतीच्या वेळी ऑक्सिजनची कमतरता
मल्टीटास्किंगचा येणारा ताण
मुले जास्त टीव्ही आणि मोबाईल पाहत असतात
प्रदूषणासारखी पर्यावरणीय कारणे
निरोगी पोषण आणि आहार
मानसिक ताण
झोपेचा अभाव
शारीरिक हालचालींचा अभाव
कौटुंबिक इतिहास