अदनान सामीनं सांगितला पाकिस्तानसोबतचा तो तणावपूर्ण किस्सा

एका नव्या मुलाखतीत अदनान सामीनं पाकिस्तानसोबत तणावपूर्ण संबंधांचं एक उदाहरण शेअर केलं आहे. त्यात त्यानं सांगितलं की त्याला त्याच्या आईच्या अंत्यविधीत देखील सहभागी होण्याची परवानगी नव्हती.

अदनान सामीचा जन्म लंडनमध्ये झाला. तर त्याचे वडील हे पाकिस्तानी होते. पण २०१६ मध्ये अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मिळालं. त्याच्या वडिलांनी नेहमीच सांगितलं की कशा प्रकारे पाकिस्तानच्या राजकारणामुळे त्यांना त्यांचा मुलगा अदनान सामीला भेटता आलं नाही.

अदनाननं सांगितलं की ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याच्या आईचं निधन झालं. तर तो त्यांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न करत होता. अदनाननं सांगितलं की त्याच्या आईच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कारण त्यांना आरोग्या संबंधीत कोणत्याही समस्या नव्हत्या. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांच्या त्याची परिस्थिती कशी समजून घेतली. याविषयी सांगत अदनान म्हणाला, ‘मी इथल्या सरकारला विचारलं की माझी जाण्याची इच्छा आहे, तर तुम्हाला काही अडचण नाही.’ त्यांनी म्हटलं की’ तुझ्या आईचं निधन झालंय, तर तू जायलाच हवं. त्यांच्याकडून काही अडचण नव्हती.’भारतीय अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर जेव्हा अदनाननं पाकिस्तानी व्हीजासाठी अर्ज केला. तर त्यांनी तो स्वीकारला नाही. अदनाननं त्यांना सांगितलं की ‘त्याला त्याच्या आईच्या अंत्यविधीला जायचं आहे. पण त्यांनी याला नकार दिला. अखेर अदनाननं त्याच्या आईचे अंत्यसंस्कार व्हाट्सअपवर एका व्हिडीओच्या माध्यमातून पाहिले.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here