अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं. २४२ प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. अनेकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात टेकऑफ दरम्यान एअर इंडियाचे हे विमान कोसळले आहे.

आकाशात काळ्या धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. दुसरीकडे, आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताचे कारण आणि नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही वेळातच ते मेघानीनगर परिसराजवळ कोसळले. मेघानीनगर हे विमानतळापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here