एड्स समूळ निष्क्रीय होऊ शकतो! अमेरिकी शास्त्रज्ञांचं संशोधन

एचआयव्ही या आजाराबद्दल अजूनही लोकांमध्ये अज्ञान आहे. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र एका संशोधनातून एचआयव्ही विषाणू निष्क्रिय करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांनी खूप मोठी झेप घेतली आहे. अमेरिकन संशोधकांनी असा एक रेणू शोधून काढला आहे जो एड्स विषाणू नष्ट नाही मात्र तो निष्क्रिय करण्याच्या उद्देशाने उपचार केले जात आहे. जीन थेरपीद्वारे उपचार घेणे आता शक्य झाले आहे. यामुळे रुग्णांना दररोजच्या औषधांपासून खूप आराम मिळेल.

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनमधील शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात म्हटले आहे की, जीन थेरपीचा वापर मानवी शरीरात एड्स विषाणू निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. या शोधात विषाणू कायमचा थांबवण्याची क्षमता आहे, परंतु त्याच वेळी ते सध्या वापरल्या जाणाऱ्या अँटीरेट्रोव्हायरल औषधांच्या दुष्परिणामांपासून देखील मुक्तता प्रदान करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here