अजित पवारांनी बारामतीला असताना काकांना उद्देशून एक विधान केलंय. या विधानावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे. बारामतीती एका कार्यक्रमात रस्त्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना अजित पवारांनी एक मिश्किल टिप्पणी केलीय. ‘रस्त्याच्या कामांबाबत काकाला विश्वासात घ्या. कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही’, असं अजित पवारांनी म्हटलंय.
अजितदादांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. यानंतर बोलताना अजितदादांनी आपण काका कुतवलांबाबत बोलल्याचं म्हटलंय.नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल ‘दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत’, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणालेत.