अजित पवारांनी आज एका हिंदी पत्रकाराला सुनावत मराठी बाणा दाखवून दिला. अजित पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते प्रश्नांची उत्तरं देत होते. त्यावेळी एका हिंदी पत्रकाराने प्रश्न विचारला.
त्यावर अजित पवारांनी आधी मराठी आणि नंतर हिंदी असं सांगत उत्तर देण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी पत्रकाराला खडसावत म्हटलं की, “ही काय पद्धत आहे तुमची, पहिलं मराठी चालतं. हा शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मराठी झाल्यावर मग हिंदी”.