अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहिण्याचा आवाहन केलंय. अजित पवारांनीच या पुस्तकाचं नावदेखील ठरवलंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात जिव गमवावा लागलेल्या निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना यांचा बदला जेवढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घेतला पाहिजे त्यांचा खात्मा केलाच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला. मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायचा सल्ला देणार असल्याचे ते म्हणाले. ‘फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिल आहे. आता तुम्ही दुसरं पुस्तक लिहा. त्याचं नाव ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असं द्या’, असं ते फडणवीसांना उद्देशून म्हणाले.