मुंबईच्या लोकप्रिय उद्योजिका सीमा सिंह यांची लेक डॉ. मेघना सिंह लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काल 16 एप्रिल रोजी मेघना सिंहला संगीतचं कार्यक्रम ठेवण्यात आलं. ज्यात बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती आणि त्यामुळे संगीतची रात्र ही सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे.
सोशल मीडियावर संगीतच्या कार्यक्रमातील हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये करण जोहर, सुष्मिता सेनपासून शाहिद कपूरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या संगीताच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. इतकंच नाही तर काही सेलिब्रिटींनी तर खास परफॉर्मन्स देखील ठेवला होता. त्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात लोकांच्या मनात प्रश्न आहेत की अखेर सीमा सिंग आहे तरी कोण की जिच्या मुलीच्या लग्नात बॉलिवूड हजरं होतं.
सीमा सिंग एक सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका आहेत. मेघाश्रे असं त्यांच्या NGO चं नाव आहे. ही एनजीओ संस्था वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण देते. 2023 मध्ये त्यांनी भारताच्या गर्भाशयाच्या कर्करोगमुक्तीसाठी जागरूकता निर्माण केली होती आणि त्यामुळे त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मानित केले होते. सीमा सिंग यांचे लग्न अल्केम लॅबोरेटरीजचे प्रवर्तक मृत्युंजय कुमार सिंग यांच्याशी झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगी मेघना सिंग आणि मुलगा श्रेय सिंग. मेघा एक त्वचारोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या आहे.