सध्या अमेरिका आणि इराणमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी इराणला अणु कराराबाबत इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने अणुकरार स्वीकारला नाही तर, त्यांच्यावर जबरदस्त बॉम्ब हल्ले करण्यात येतील. ट्रम्प प्रशासनाने हिंद महासागरातील डिएगो गार्सिया मध्ये B-2 बॉम्बर तैनात केले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील आपले अंडरग्राउड क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या इराणच्या अणुउर्जेच्या वाढत्या क्षमतांमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केल्याचा आरोप देखील आहे. सध्या इराण आणि अमेरिकेत वाढता तणाव पाहता संभाव्य युद्धाची शक्यता आहे.
मात्र याचा परिणाम भारतावर देखील होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून इराण अणु शस्त्रास्त्रे बनवण्याचे प्रकल्पांवर कार्य करत आहे. दरम्यान अमेरिकेसारख्या देशांना इराण या अणवस्त्रांचा वापर इतर देशांना नष्ट करु शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या अणू कार्यक्रमांवर आळा घालण्यासाठी काही निर्बंध लागू केले होते. दरम्यान व्यापार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास याचा मोठा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. भारत मध्य पूर्वेतून 70% कच्च्या तेलाची गरज भागवतो. दरम्यान इराणवरील निर्बंधामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊन याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.