बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटसोबत दुसऱ्या मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवलमध्ये सहभागी झाला. या कार्यक्रमात दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आमिर खान हा फोटो काढण्याआधी गौरी सोबत कसा वागतो यानं सगळ्यांचे लक्ष होते. सगळे त्यामुळे त्याचे कौतुकही करत आहेत. त्यानंतर दोघांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पापाराझींना पाहून स्माईल केली. आमिर आणि गौरीचा हा व्हिडीओ आताच्या X म्हणजेच आधीच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
एका व्हिडीओमध्ये आमिर खान हा कार्यक्रमात पोहोचल्यानंतर फोटो काढण्यासाठी समोर येतो, तर त्यासाठी तो आधी गौरीच्या दिशेनं हात पुढे करतो. गौरी त्याचा हात पकडते. त्यानंतर पापाराझींसाठी ते पोज देताना दिसतात. त्यावेळी त्यांच्यासोबत चायनिज अभिनेता शेन टेंग आणि मा ली देखील दिसले. एका फोटोत आमिर आणि गौरी, शेन टेंग आणि मा लीसोबत कॅमेऱ्या समोर पोज देताना दिसत आहे. तर तो हसला देखील तसेच ते बोलताना दिसले. तर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमिर खाननं काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे. त्यावर त्यानं काळ्या रंगाची शॉल घेतली आहे. गौरीनं फ्लोरल प्रिंटसी साडी नेसली आहे आणि तिनं चष्मा लावला आहे.