कॉलर ट्यूनवरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं बिग बी यांनी! वाचा काय म्हणाले

सोमवारी, अमिताभ यांनी त्यांच्या एक्स हँडलवर सहज एक ट्विट केले. “जी हाँ हुजूर, मैं भी एक प्रशंसक हूं… तो??” अशी पोस्ट अमिताभ यांनी केलेली. या पोस्टवर एका युझरने अभिनेत्याला ट्रोल करण्यासाठी रिप्लाय दिला. “तो फोन पे बोलना बंद करो भाई,” असं हा युझर म्हणाला. मात्र सध्या अमिताभ ज्या मूडमध्ये आहेत त्यानुसार ते आता गप्प बसणाऱ्यांमधले राहिलेले नाहीत. बिग बींनी देखील कॉलरट्यूनसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या या सातत्याच्या आक्षेपाची चर्चा कायमची थांबवण्याचा निर्णय घेत खोचक रिप्लाय केला. “भावा, सरकारला सांगा, त्यांनी आम्हाला जे करायला सांगितले ते केले,” असं उत्तम अमिताभ यांनी दिलं.

अमिताभ यांची व्हायरल कॉलरट्यून ही देशातील प्रत्येक व्यक्तीने एखाद्याला फोन केल्यानंतर रिंग वाजण्याआधी ऐकू येते. नागरिकांना सायबर गुन्हे आणि फसवणुकीबद्दल जागरूक करणारा एक प्रीरेकॉर्ड केलेला संदेश सरकारकडून बंधनकारक करण्यात आल्यामुळे प्ले केला जातो. मात्र हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु असून आता इंटरनेटवर यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. आता हा प्रकार पुन्हा पुन्हा तोच तोचपणा असल्यासारखा आहे. अनेकांनी आणीबाणीच्या वेळी आणि आपत्कालीन कॉल करायचा असेल तर आधी हे ऐकत बसावं लागत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना हा प्रकार त्रासदायक ठरू शकतो असं परखड मत मांडलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here