अमिताभ बच्चन म्हणजे व्हायरस, वाचा कोण म्हणालं हे!

अनेक अभिनेत्यांनी अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगताना तोंडभरुन कौतुक केलं आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत, ‘खुदा गवाह’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी अमिताभ किती महान अभिनेते आहेत असं सांगितलं आहे. तसंच आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला कशाप्रकारे तोंड द्यायचे याबद्दल सांगितलं आहे.

Red FM Podcasts शी संवाद साधताना किरण यांनी सांगितलं की, “अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं म्हणजे व्हायरससह काम करण्यासारखं आहे. ते इतके महान अभिनेते आहेत आणि त्याची आवड इतकी जबरदस्त आहे की तो तुमच्या रक्तात मिसळतं. एकदा तुम्ही अमिताभ बच्चनसोबत काम केले की, त्यांच्या त्या व्यक्तिमत्वातून बाहेर पडणं खूप कठीण असतं, खासकरुन ते तुमच्याशी कसं वागतात ते प्रभाव पाडणारं असतं”.

अमिताभ यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना किरण यांनी सांगितलं की, “काही कलाकार चित्रपटात खलनायक मारत असेल तर प्रतिक्रिया देत नाहीत, पण अमिताभ बच्चन त्यातील नाहीत. अमितजी मी दिलेल्या प्रत्येक मुक्क्याला प्रतिक्रिया देत असत. मी मारलेल्या प्रत्येक फटक्यानंतर ते 2 फूट मागे जात असत. ते खूप चांगले अभिनेते आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची चांगली माहिती आहे. तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करू शकता. पण अमितजींबद्दल मी एक गोष्ट शिकलो आहे ती म्हणजे जेव्हा त्यांना तुमच्याशी बोलायचे असतं तेव्हाच तुम्ही त्यांच्याशी बोलता.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here