अवघ्या चार दिवसांनी होणाऱ्या आयपीएल 2025 च्या प्लेऑफ सामन्याआधी विराट भक्तीमध्ये लीन झालेला दिसला. येणाऱ्या प्लेऑफ सामन्यांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) चा अनुभवी फलंदाज विराट कोहली अयोध्येला पोहोचला आहे. अयोध्येत यावेळी त्याच्या सोबतीला अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माचीही सोबत होती. दोघांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. कोहलीच्या या अध्यात्मिक भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
रामलल्लाचे दर्शन घेतल्या नंतर दोघांनी प्रसिद्ध हनुमान गढी मंदिरातही जाऊन दर्शन घेतले. मंदिराचे महंत संजय दास महाराज यांनी सांगितले की, “कोहली आणि अनुष्काला अध्यात्माबद्दल विशेष ओढ आहे. दर्शनानंतर दोघांशी काही अध्यात्मिक चर्चा देखील झाल्या.”