देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे.सन 2017 मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी 5 मे रोजी विवाह झाला. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरेने बोलावणे आले आहे. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून आज ते रवाना झाले आहेत. आज नववधुसोबत मनोज पाटील सत्यनारायणाच्या पुजेला बसणार होते. पण पूजा रद्द करुन जवान मनोज पाटील रवाना झाले आहेत.
लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झाले. मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज गुरुवारी सीमेवर रवाना झाले आहेत.