AI तंत्रज्ञानात सातत्याने काही ना काही बदल होत आहेत. AI विश्वात Open AI चॅट GPT राज्य गाजवत असताना अजून एक नवा खेळाडू बाजारात दाखल झाला आहे. Deepseek असे त्याचे नाव असून हे चीनचे मॉडेल आहे. याची सध्या जगभरात चर्चा आहे. याकडे संपूर्ण तंत्रज्ञान जगताचे लक्ष लागलं आहे.
हे मॉडेल आपल्या किमतीच्या तुलनेत अमेरिका येथील सर्वात प्रचलित AI मॉडेल्सपेक्षा अधिक कार्यक्षम आणि सुस्पष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे.
DeepSeek V3 या मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी 6 मिलियन डॉलर्सपेक्षा कमी खर्च आल्याचा दावा कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. यामुळे गुगल, मेटा यासारख्या अमेरिकन टेक कंपन्यांच्या वर्चस्वावर परिणाम होऊ शकतो.
डीपसीक हे चिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)अॅप, चॅटजीपीटी (ChatGPT) आणि या क्षेत्रातील इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अमेरिका, युके आणि चीनमध्ये अॅपलच्या अॅप स्टोअरवर आघाडीचं मोफत अॅप बनलं आहे. डीपसीक अॅप लाँच झाल्यापासून त्याची लोकप्रियता वाढली आहे. हा काही फक्त एका कंपनीचं अॅप लोकप्रिय झालं एवढाच मुद्दा नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिका आणि अमेरिकन कंपन्यांचा दबदबा किंबहुना मक्तेदारी असल्याचं चित्र जगभरात निर्माण झालं आहे.
पण चीनच्या या नव्या मॉडेलमुळे अमेरिकन कंपन्यांची झोप उडाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात अमेरिकेसमोर चीनने एक आव्हान निर्माण केलंय.

Deepseek कसं काम करतं?
मूळच्या चीनच्या कंपनीने तयार केलेले DeepSeek R1 हे एक ओपन सोर्स एआय मॉडेल आहे. तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी हा एक खुला आणि मोफत असा मंच आहे. यावर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक तसेच कार्यालयीन समस्यांवर उत्तर शोधू शकतात. तुम्ही प्ले स्टोअरवरून तसेच आयओएस स्टोअरवरून हे ॲप इन्स्टॉल करू शकता.
येणाऱ्या काळात चॅट जीपीटीपेक्षा DeepSeek हे एआय चॅट बॉट किती वरचढ ठरणार? हे लवकरच समजणार आहे.