मीरारोड येथे मराठी माणसाच्या मुद्द्यावरुन आज मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. एका दुकानदार महिलेने केलेल्या वक्तव्याला विरोध करत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मनसेसोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील पाठिंबा दिला. पण या मोर्चात पोलिसांनी मनसैनिकांवर केलेल्या कारवाईमुळे याला वेगळे वळण मिळाले. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलं. आपल्या सुटकेनंतर अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रताप सरनाईकांच्या बाबतीत जे काही झालं ते योग्य नाही झालं. त्यांच्यावर बाटल्या फेकणे हे चुकीचेच अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती. ते ज्यावेळी येथे आले तेव्हा ते येथे मराठी माणूस म्हणून आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी जी काही वक्तव्य केली ती मला पटत नाही. मराठी माणसाला मोर्चा काढून देण्याबद्दल जे बोलले ते पटलं नाही. पण मी आता त्यांचा एक बाईट ऐकला ज्यामध्ये ते बोलत होते की, मी आमदार आणि मंत्र्यांची चादर बाजूला करुन मराठी माणूस म्हणून मोर्चाला येत होते. तर त्यांना येऊ द्यायला हवं होतं. सगळे मराठी लोकं एकत्र होते.