‘येसू,येसू..फेम पाद्री बाजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणी मोहाली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहाली न्यायालयाने आज (१ एप्रिल) हा निर्णय दिला. गेल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती, तेव्हा बाजिंदर सिंगला २०१८ च्या झिरकपूर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता.
बाजिंदर सिंगला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “बाजिंदर सिंग तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देखील तो असाच गुन्हा करू शकतो. त्याचं मानसिक संतुलन व्यवस्थित नाही. त्यामुळे तो तुरुंगातच राहावा असं मला वाटतं. आज अनेक पीडित मुली जिंकल्या आहेत. मात्र, आमच्यावर हल्ल्याची शक्यता असल्याने मी डीजीपींना आमची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती करते.”, असं पीडितेने म्हटलं आहे.