रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर सफरचंद फळाच्या आरोग्यदायी उपयोगांचा तो दाखला आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने भरलेले सफरचंद हे फळ संपूर्ण आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे.
सफरचंद हे न्यूट्रीशिनल सत्वांनी परिपूर्ण आहे. त्यामध्ये क जीवनसत्त्वसह भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि कोलेजन उत्पादनासाठी फायदेशीर ठरतात. तसेच सफरचंद हे पोटॅशियमचे उत्कृष्ट स्रोतदेखील आहे. त्यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियमनासाठी आवश्यक असलेली खनिजे आहेत. त्याव्यतिरिक्त सफरचंदामध्ये फायबर (Health Benefits Of Apples ) असते, जे पचनास मदत करते, तृप्तता वाढवते व वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरते.
सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स, जसे की क्वेर्सेटिन व फ्लेव्होनॉइड्स, हृदयविकार, टाईप-२ मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
रोजच्या आहारात सफरचंदांचा समावेश कसा करावा?
सफरचंदाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही स्नॅक्स म्हणून सफरचंद खाऊ शकता. सॅलड्स किंवा ओटमिलमध्ये (oatmeal) सफरचंदाचे तुकडे घालू शकता किंवा स्वादिष्ट डेझर्टमध्ये त्याला बेक करू शकता. अशा प्रकारे सफरचंदाला तुमच्या आहाराचा एक भाग बनवून, तुम्ही तुमचे एकूण आरोग्य सुधारू शकता.