एका विशिष्ट वयानंतर हाडांची झीज व्हायला लागते. अशावेळी अनेकदा सांधेदुखी, हाडांमधून आवाज येणे यासारख्या समस्या जाणवतात. अनेकदा गुडघे दुखीवर डॉक्टर प्रत्यारोपण हा एकच पर्याय असल्याचं सांगतात. अशावेळी तुम्ही आहारात विशिष्ट पदार्थांचं सेवन केलं तर सुरुवातीपासूनच फायदा होतो आणि संभाव्य समस्या टळतात.
जर तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या काळ्या मनुकांचे पाणी प्या. हे पाणी हाडे मजबूत करते, रक्तदाब नियंत्रित करते, त्वचा आणि केस सुधारते, झोप सुधारते, दृष्टी सुधारते, पोट स्वच्छ करते आणि लोहाची कमतरता दूर करते.
भिजवलेल्या मनुकामध्ये फॉस्फरस, बोरॉन आणि कॅल्शियम असते. या तीन गोष्टी आपली हाडे मजबूत करतात. हे हाडांना तुटण्यापासून किंवा कमकुवत होण्यापासून वाचवतात. म्हणून, दररोज सकाळी त्याचे पाणी पिल्याने हाडे मजबूत होतात.