आईस बाथ किती फायदेशीर? संशोधनातून सत्य आलं समोर

हल्ली अनेक कलाकार, खेळाडू बर्फाच्या पाण्यात ‘आइस बाथ’ घेतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असतात. व्यायामानंतर फायद्यासाठी ते मानसिक आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये ही थेरपी मदत करते असा समज आहे; पण हा ‘आइस बाथ’ खरोखरच उपयुक्त ठरतो का? चला जाणून घेऊया.

काही वर्षांपासून ‘आइस बाथ’ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. एकेकाळी खास खेळाडूंसाठी राखीव असलेल्या या आइस बाथला आता जगभरातील फिटनेस प्रिय आणि व्यायाम करणारे लोक स्वीकारत आहेत. ‘आइस बाथ’ (ज्याला ‘कोल्ड वॉटर इमर्सन’, असेही म्हणतात). त्यामध्ये तुमचे शरीर ठरावीक वेळेसाठी बर्फाच्या पाण्यात बुडवावे लागते. बर्फाच्या पाण्याचे तापमान सामान्यतः १०-१५°C पर्यंत असते.

आइस बाथ घेण्याचे एक मुख्य कारण म्हणजे स्नायूंच्या वेदना कमी करणे आणि व्यायामानंतर शरीरप्रकृती सुधारणे. धावपटू, वेटलिफ्टर्स व फुटबॉल खेळाडूंसह खेळाडू सामान्यतः आईस बाथ वापरतात. आणि असे बरेच पुरावे आहेत की, व्यायामानंतर आइस बाथ घेणे आरोग्याची तक्रार दूर होण्यास मदत करू शकते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, तीव्र व्यायामानंतर लगेचच ‘आइस बाथ’ घेतल्याने स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. स्नायूंची ताकद, शक्ती व लवचिकता यांसारख्या बाबींमध्ये सुधारणा होण्यासाठी ‘आइस बाथ’ मदत करू शकतो हेदेखील दर्शविले गेले आहे.

व्यायामानंतर होणारी जळजळ, स्नायूंना येणारी सूज व स्नायूंचे नुकसान कमी करून, सुधारणा करण्यास आइस बाथ उपयोगी ठरतो. तसेच, ‘आइस बाथ’मुळे लॅक्टेटसारख्या मेटाबोलाइट्सचे क्लिअरन्स सुधारतात. म्हणून जर तुम्हाला सलग दोन दिवस तीव्र व्यायाम करावा लागत असेल, तर ‘आइस बाथ’ हा एक चांगला पर्याय असू शकतो; परंतु तुम्ही खेळाडू असलात तरीही तो सातत्याने वापरला जाऊ नये, असे या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here