लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग नेहमीच तिच्या यूट्यूब व्लॉगमधून चाहत्यांसोबत तिच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. मात्र, अलीकडे तिनं अपलोड केलेल्या एका नव्या व्हिडिओमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. या व्हिडिओत भारतीनं सांगितले की ती सध्या आजारी असून रक्त तपासणी करत आहे.
व्लॉगमध्ये भारती या सगळ्या प्रकरणाविषयी बोलताना दिसली, ‘मी जेव्हापासून बँकॉकहून परतले आहे, तेव्हापासून खूप अशक्तपणा जाणवतोय, तापसुद्धा आहे. तर हर्षनं तिला ब्लड टेस्ट करायला सांगितली. व्हिडीओमध्ये इंजेक्शनची भीती लक्षात येताच भारती भावुक होते आणि रडते. पण शेवटी ती धैर्य दाखवते आणि टेस्ट करून घेते. हे पाहून त्यांचा मुलगा गोला आश्चर्यचकित होतो आणि विचारतो. हे काय आहे? यावर हर्ष मस्करी करत म्हणतो की, ‘जास्त चॉकलेट खाल्लंस तर तुलाही इंजेक्शन घ्यावं लागेल.’