लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत धुसूफूस सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलीय.
माझ्या खात्याचे पैसे लाडकी बहीणसाठी वर्ग करण्यात आले. पूर्वीदेखील ७ हजार कोटी वर्ग करण्यात आले होते. याची मला पुसटशी कल्पना नसल्याचे धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाठी यांनी केलंय. या खात्याची आवश्यकता नसेल तर हे खाते बंद करा. दलित मागासवर्गीय काय करायचं बघू अशा शब्दात त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केलीय.
याला अन्याय म्हणा, कट म्हणा, असे का करताय कळत नाही. फायनान्स विभाग मनमानी करतंय. सहन करण्याची मर्यादा आहे. सगळं कट करून टाका. कशाला हवी शिष्यवृत्ती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या खात्याचा निधी वर्ग करता येत नाही. कट करता येत नाही. फायनान्स वाले जास्त डोके चालवत असेल तर हे आम्हाला मान्य नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले.