बिग बॉस मधील या लोकप्रिय जोडीचे झाले ब्रेक अप! एकत्र मालिकेतही केले होते काम

काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात आल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात; तर काही कलाकार रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण येते. अशाच चर्चेत असलेल्या एक जोडीपेकी अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांची जोडी आहे. आता मात्र बिग बॉसमध्ये झळकलेले अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे.

अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी या दोन कलाकारांना ‘उडारियाँ’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. ‘उडारियाँ’ या शोनंतरही ते अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करीत असल्याचे दिसले होते. त्यानंतर ते बिग बॉस १६ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर ते एकमेकांना डेट करीत असल्याचे म्हटले जात होते. इतकेच नाही, तर ते लवकरच लग्न करतील, अशा चर्चांनाही उधाण आले होते. या कलाकारांनी मात्र ते फक्त मित्र असल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर या कलाकारांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. चाहते त्यांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी प्रार्थना करीत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here