बिग बॉस फेम लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील ( Sonali Patil ) नेहमीच चर्चेत असते. अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सोनाली ‘बिग बॉस मराठी ३’ ( Bigg Boss Marathi 3 ) नंतर चांगलीच प्रसिद्धीस आली होती. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी सोनाली सोशल मीडियावगरही सक्रीय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सोनालीने स्वत:च्या हातांनी पुरणपोळी बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. देवाच्या नैवेद्यासाठी ती या हे करत आहे. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने माहितीही दिली आहे. “आत्मलिंग जत्रा… मामाचं गाव… पुरणपोळी… सासनकाठी नैवेद्य” असं कॅप्शन लिहित सोनालीने पुरणपोळी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
सोनाली पाटीलचे चाहत्यांकडून कौतुक
एकाने या व्हिडीओखाली “मराठमोळी” असं म्हटलं आहे तर दुसऱ्याने “तू तर सुगरणच आहेस” अशी कमेंट केली आहे. तसंच “खूप छान”, “यातून तुझा साधेपणा दिसतो”, “मस्तच” या आणि अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी सोनालीच्या पुरणपोळी करतानाच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.