मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी बीकेसीतील जियो कन्व्हेशन सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील रेल्वेसंदर्भात काय कामं सुरु आहेत याची माहिती देतानाच भविष्यात कोणती कामं, प्रकल्प राबवले जाणार आहेत याची माहितीही देण्यात आली. ही महिती देतानाच मुख्यमंत्र्यांनी सर्वच शिवप्रमेंना सुखद धक्का दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला 10 दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत केली. रेल्वेच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होईल, असा विश्वासही या दोघांनी पत्रकारांसमोर बोलून दाखविला.