ठाण्यातील वाघबीळ ब्रिज चौकात वाहतूक पोलीस आणि दुचाकीस्वारामध्ये जोरदार हाणामारी झाली. हेल्मेट घातलं नसल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात येत होती, त्याला दुचाकीस्वाराने विरोध केला. हा दुचाकीस्वार चक्क पोलिसांवरच धावून गेला. दुचाकीस्वार पाच पोलिसांनाही आवरला नाही. त्याने एका पोलिसाला लाथा मारल्या. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पोलिसांनी याप्रकरणी ५६ वर्षीय अनिरुद्ध कुवाडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून अटक केली आहे. अनिरुद्ध कुवाडेकर हा हेल्मेटशिवाय प्रवास करत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांनी त्याचा चालान भरायाला सांगितले, त्यावेळी त्याचा पारा चाढला. अनिरुद्ध याने वाहतूक पोलिसालाच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ड्युटीवर असणाऱ्या इतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो कोणालाही आवरला नाही.